टोळ - जनतेची वाटमारी |
सार्वजनिक बांधकाममंत्री व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना हजारे यांनी पत्र लिहित टोलबाबत सवाल केला आहे. टोल वसुलीच्या सध्याच्या पद्धतीत पारदर्शकता नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. रोड टॅक्स भरलेला असल्याने टोलच्या रस्त्याला समांतर दुसरा रोड असला पाहिजे. जर एखाद्या नागरिकाला टोल द्यायचा नसेल तर त्याला समांतर रस्त्याने जाण्याची सोय हवी व त्या समांतर रस्त्यावर टोल आकारणे अन्यायकारक आहे, असे हजारे यांंनी नमूद केले.
वेगवेगळ्या कंपन्यांच्या वाहनांची संख्या वाढत आहे. साहजिकच वाहनांची नोंदणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वाहन संख्येनुसार टोल नाक्यावरील प्रत्येक वाहनांवरील टोल आकारणी कमी होणे आवश्यक आहे. मात्र प्रत्येक वाहनामागे टोल आकारणी वाढली आहे हा जनतेवर अन्याय असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. बीओटी तत्त्वावर रस्त्याबरोबर इमारत व अन्य बांधकामे करून घेऊन लोकांवर टोल आकारणे, सहा ते दहा किमीच्या अंतरात टोलनाके बसवणे, टोलच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहांसारख्या सुविधाही देणे कंत्राटदारावर बंधनकारक नसणे, या बाबींनाही हजारे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
टोल आकारणी होत असलेल्या रस्त्याच्या कामावर किती खर्च आला, ठेकेदाराबरोबर काय करार झाला आहे व टोल कधी बंद होणार हे प्रत्येक टोल नाक्यावर ठळकपणे दाखवले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
By: Anna Hazare
Maharashtra Times - 17-10-2010
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.