शिवराजेश्वर मंदिर - सिंधुदुर्गकिल्ला |
इ.स. १६९५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 'शिवराजेश्वर' हे मंदिर शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज्यांची जी मूर्ती आहे, ती नावाड्याच्या वेशातील असून तिच्या डोक्यावर मंदिल आहे. पद्मासनावर बसलेली मूर्ती एका हाताने आचमन करीत आहे तर दुसरा हात गुडघ्यावर आहे. हातात कडे आहे.
या मंदिराच्या प्रशस्त सभा मंडप पुढे इ.स. १९०६ \ ०७ च्या मध्ये करवीर छत्रपती शाहू महाराजांनी बांधला.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.