धामापूर हे अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील तलाव. या ठिकाणी आपण कुडाळ किंवा मालवणहूनही जाऊ शकतो.(कुडाळ पासून १२ कि. मी.) या तलावाकडे जाताना आपल्याला दिसतात त्या भगवती मंदिराच्या पायरिया. पायरिया चढून गेल्यावर भगवती मंदिराचे दर्शन घडतं. मंदिराला लागूनच हा प्रसिद्ध धामापूर तलाव आपल्या द्रिष्टस पडतो. या ठिकाणी काळसे - धामापूर पर्यटन सेवा संस्थेने बोटींगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.