(रंगानाम्+आवली-रंगावली=रंगोळी=रांगोळी) ही कलात्मकरीत्या काढली जाते.प्रथम ठिपके देउन व त्यानंतर त्या ठिपक्यांना जोडण्याची पद्धत आहे.साधारणतः,पुर्वी धान्याच्या पिठास रंग देउन रांगोळी काढली जात असे. रोज सकाळी घरासमोरील अंगणात सडा टाकुन रांगोळी काढणे शुभ असते असे मानतात. देवपुजेपुर्वीपण देवासमोर रांगोळी काढतात.दारासमोर काढलेली रांगोळी ही घर गृहीणीच्या कलात्मकतेचा परीचय देते.पांढर्या रांगोळीने रांगोळीचे गोपद्म वा स्वस्तिक काडुन किमान त्यास थोडे हळदी कुंकु टाकण्याचीपण पद्धत आहे.आजकाल बाजारात विविध रांगोळीचे छापे मिळतात त्यांनीपण रांगोळी काढली जाते.रांगोळीचे स्टिकर्सपण बाजारात मिळतात.
भारताच्या विविध प्रांतात रांगोळीस काय म्हणतात
• गुजरात - साथिया
• तामिळनाडू - कोलम
• राजस्थान - मांडणा
• मध्य प्रदेश - चौकपूरना
• उत्तर प्रदेश - सोनारख्खा
• बंगाल - अल्पना
• केरळ - पुवीडल
• आंध्र प्रदेश - मुग्गू
• बिहार -अरीपण
• ओरिसा -झुंटी
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.