1) एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
तीन लिंबू झेलू बाई चार लिंबू झेलू
पाचा लिंबाचा पानोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे ला
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी न्हवे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला बुख लागली
नीज रे नीज रे चिलार बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळ्या चींचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी ........
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.