रामेश्वर मंदिर - गिर्ये |
रामेश्वर देवालय खोलगट भागात आहे. मुख्य रस्त्यावरून अगर प्रवेशद्वाराच्या नजीकच्या पठारावरून हे मंदिर दिसत नाही. देवालयात जाण्यासाठी दीडशे मीटर लांब पंधरा मीटर खोल अशा जांभया दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग काढलेला आहे. मंदिरातील मुख्य गाभरयात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे पन्नास किलो चांदीची नंदीवर आरूढ मूर्ती असलेली चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती आहे.
ई.स. १७९२/९३ मध्ये पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख आनंदराव धुळप यांनी इंग्रजांच्या जहाजावरून पकडून जप्त करून आणलेली अजस्त्र घंटा या ठिकाणी असून ही घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी ई.स.१८२७ मध्ये श्री देव रामेश्वरला अर्पण केली.
या रामेश्वर मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. ते शिव भक्त होते. रामेश्वर मंदिर भोवतालची दगडी तटबंदी, फरसबंदी पटांगण सरखेल संभाजी आंग्रे यांनीच बांधले.
If you like this please Link Back to this article...
0 comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.