ऐलमा पैलमा गणेशदेवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
गोदावरी काठच्या उमाजी नायका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे
दुधोन्ड्याची लागली टाळी आयुष देरे भामाळी
माळी गेला शेताभाता पाउस पडला येताजाता
पडपड पावसा थेम्बोथेम्बी थेम्बोथेम्बी आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे भोंडल्या तुझी सोळा वर्षे
आतुल्या मतुल्या चरणी चातुल्या
चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत गोंडे
एकेक गोंडा विसाविसाचा साड्या डोंगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यानो अडीचशे पाव्ल्यानो If you like this please Link Back to this article...
