कारल्याचे वेल लाव ग सुने लाव ग सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा….
कारल्याला कार्ली येऊ दे ग सुने येऊ दे ग सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा…..
कारल्याला कार्ली आलं हो सासूबाई आलं हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…..
कारल्याची भाजी कर ग सुने कर ग सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा…..
कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा ग सुने खा ग सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा.....
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…..
आपलं उष्ट काढ ग सुने काढ ग सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा....
आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा....
आणा फणी घाला वेणी जाउ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा
If you like this please Link Back to this article...
![Stumble Upon Toolbar](http://cdn.stumble-upon.com/images/32x32_su_round.gif)
0 comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.