Wednesday, June 8, 2011

पावसाळ्यात - चला कोकणात

kanchan athalye | Wednesday, June 08, 2011 | Best Blogger Tips

सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा, निळ्याशार अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेली व निसर्गसौंदर्याने नटलेली कोकण किनारपट्टी आणि आंबा, फणस, काजू आणि नारळी-पोफळींच्या बागांनी फुलणारी कोकणभूमी पर्यटकांना नेहमीच खुणावत आली आहे. या भूमीतील प्रश्नचीन ऐतिहासिक किल्ले, प्रश्नचीन मंदिरे, लहान-मोठय़ा नद्या आणि त्यांच्या आसपास असणारे सृष्टीसौंदर्य मनाला निश्चित भुरळ पाडणारे आहे. पावसाळ्यात तर कोकणचे निसर्गसौंदर्य आणखीनच बहरते. त्यामुळे या काळात एकदा तरी कोकणातील महत्त्वाच्या स्थळांचा आनंद घेण्यास काय हरकत आहे!
मुंबई, गोवा ही पर्यटनासाठी प्रसिद्धीची ठिकाणे. या दरम्यान, मुंबईपासून साधारणत: ३७५ कि.मी.

अंतरावर कोकणची भूमी वसली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा या कोकणभूमीत समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर व मंदिर परिसरातील नयनरम्य समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील टेकडीवर बांधलेल्या सुमारे ५०० वर्षापूर्वीचे मंदिर स्वयंभू मानले जाते. रूपेरी वाळूचा विस्तीर्ण किनाराही गणपती मंदिराबरोबरचे मुख्य आकर्षण आहे. दररोज हजारो पर्यटक येथील वाळूच्या किनाऱ्यावर फेरफटका मारीत व समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटतात. कोकण किनारपट्टीवरील एक सुरक्षित म्हणून जयगड बंदर प्रसिद्ध आहे. शास्त्री नदीच्या मुखाशी ऐतिहासिक जयगड किल्ला आहे. विजापूरच्या बादशहाने बांधलेल्या या किल्ल्याला २० बुरूज आहेत. पुरातन विभागाच्या अखत्यारित असलेला जयगड किल्ला सध्या दुर्लक्षामुळे ढासळत चालला आहे. मात्र त्याचे ऐतिहासिक महत्त्व व सौंदर्य बिलकुल कमी झालेले नाही. जयगड किल्ल्याच्या जवळच निसर्गसौंदर्यात नटलेल्या समुद्रकिनाऱ्यावर शिलाहारकालीन पुरातन कऱ्हाडेश्वर मंदिर आहे. डोंगराच्या उतरणीवर समुद्राला खेटून उभ्या असलेल्या डोंगरकपारीतून पाझरणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांच्या एकत्रीकरणातून मनगटाएवढय़ा जाडीचा झरा येथे बारमाही वाहात असतो. मुख्य म्हणजे थंडीच्या दिवसातही या झऱ्याचे पाणी उबदार असते. रत्नागिरीत आल्यावर लोकमान्य टिळकांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. रत्नागिरीतील त्यांच्या जन्मस्थानी शासनाने टिळकांचे राष्ट्रीय स्मारक उभारले आहे. राजापूर हे अतिप्रश्नचीन केंद्र. या परिसराला इतिहासाचा स्पर्श आहे. येथील निसर्गवैभव प्रत्येकाला शांत, सुंदर आणि पवित्र वातावरणात घेऊन जाते. येथे प्रकट होणाऱ्या गंगेला अपार महत्त्व आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीतील एका गुहेत मार्लेश्वर मंदिर आहे. अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेले देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. गुहेसदृश दिसणाऱ्या मंदिरात शिवशंकर विराजमान आहेत. पायथ्यापासून वाहणाऱ्या बाव नदीचा उगम २०० फुटांवरून खाली कोसळणाऱ्या ‘धारेश्वर’ धबधब्यातून होतो. पावसाळ्यात तर मोठय़ा प्रमाणात कोसळणारा धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावत्सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा, निळ्याशार अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेली व निसर्गसौंदर्याने नटलेली कोकण किनारपट्टी आणि आंबा, फणस, काजू आणि नारळी-पोफळींच्या बागांनी फुलणारी कोकणभूमी पर्यटकांना नेहमीच खुणावत आली आहे. या भूमीतील प्रश्नचीन ऐतिहासिक किल्ले, प्रश्नचीन मंदिरे, लहान-मोठय़ा नद्या आणि त्यांच्या आसपास असणारे सृष्टीसौंदर्य मनाला निश्चित भुरळ पाडणारे आहे. पावसाळ्यात तर कोकणचे निसर्गसौंदर्य आणखीनच बहरते. त्यामुळे या काळात एकदा तरी कोकणातील महत्त्वाच्या स्थळांचा आनंद घेण्यास काय हरकत आहे!
मुंबई, गोवा ही पर्यटनासाठी प्रसिद्धीची ठिकाणे. या दरम्यान, मुंबईपासून साधारणत: ३७५ कि.मी. अंतरावर कोकणची भूमी वसली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा या कोकणभूमीत समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर व मंदिर परिसरातील नयनरम्य समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील टेकडीवर बांधलेल्या सुमारे ५०० वर्षापूर्वीचे मंदिर स्वयंभू मानले जाते. रूपेरी वाळूचा विस्तीर्ण किनाराही गणपती मंदिराबरोबरचे मुख्य आकर्षण आहे. दररोज हजारो पर्यटक येथील वाळूच्या किनाऱ्यावर फेरफटका मारीत व समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटतात. कोकण किनारपट्टीवरील एक सुरक्षित म्हणून जयगड बंदर प्रसिद्ध आहे. शास्त्री नदीच्या मुखाशी ऐतिहासिक जयगड किल्ला आहे. विजापूरच्या बादशहाने बांधलेल्या या किल्ल्याला २० बुरूज आहेत. पुरातन विभागाच्या अखत्यारित असलेला जयगड किल्ला सध्या दुर्लक्षामुळे ढासळत चालला आहे. मात्र त्याचे ऐतिहासिक महत्त्व व सौंदर्य बिलकुल कमी झालेले नाही. जयगड किल्ल्याच्या जवळच निसर्गसौंदर्यात नटलेल्या समुद्रकिनाऱ्यावर शिलाहारकालीन पुरातन कऱ्हाडेश्वर मंदिर आहे. डोंगराच्या उतरणीवर समुद्राला खेटून उभ्या असलेल्या डोंगरकपारीतून पाझरणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांच्या एकत्रीकरणातून मनगटाएवढय़ा जाडीचा झरा येथे बारमाही वाहात असतो. मुख्य म्हणजे थंडीच्या दिवसातही या झऱ्याचे पाणी उबदार असते. रत्नागिरीत आल्यावर लोकमान्य टिळकांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. रत्नागिरीतील त्यांच्या जन्मस्थानी शासनाने टिळकांचे राष्ट्रीय स्मारक उभारले आहे. राजापूर हे अतिप्रश्नचीन केंद्र. या परिसराला इतिहासाचा स्पर्श आहे. येथील निसर्गवैभव प्रत्येकाला शांत, सुंदर आणि पवित्र वातावरणात घेऊन जाते. येथे प्रकट होणाऱ्या गंगेला अपार महत्त्व आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीतील एका गुहेत मार्लेश्वर मंदिर आहे. अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेले देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. गुहेसदृश दिसणाऱ्या मंदिरात शिवशंकर विराजमान आहेत. पायथ्यापासून वाहणाऱ्या बाव नदीचा उगम २०० फुटांवरून खाली कोसळणाऱ्या ‘धारेश्वर’ धबधब्यातून होतो. पावसाळ्यात तर मोठय़ा प्रमाणात कोसळणारा धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावत आला आहे. चिपळूण येथील विस्तीर्ण डोंगरात विष्णूचा सहावा अवतार आणि सप्तचिरंजीवापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान परशुरामाचे प्रश्नचीन मंदिर आहे. एका बाजूला काळ, तर दुसऱ्या बाजूला काम आणि मध्ये भगवान परशुराम अशा त्रिमूर्ती मंदिरात विराजमान आहेत. काळ्या पाषाणातील या मूर्ती अत्यंत सुंदर आहेत. अलीकडेच उदयास आलेले पर्यटनस्थळ म्हणजे डेरवण. डेरवणची शिवसृष्टी छत्रपती शिवरायाच्या जीवनाची चित्रमय ओळख करून देणारी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ७०० मीटर उंचीवरील पर्वतरांगेतील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण. आंबोली घाटातून दिसणारी सह्याद्री पर्वताची विविध रूपे, उंचावरून आवेगाने खाली झेपावणारे शेकडो धबधबे, धुक्यात हरवलेले तळ कोकण ही सारी विलोभनीय दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच या ठिकाणी गर्दी असते. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड यासारखे ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले, मंदिरे आणि अनेक निसर्गरम्य ठिकाणे कोकणात पाहावयास मिळतात. कोकणातील या सृष्टीसौंदर्याचा व ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा आनंद लुटण्यासाठी या दिवसांत थंडगार वातावरणात कुटुंबियांसह कोकणच्या भेटीवर जाण्यास काय हरकत आहे!ा आला आहे. चिपळूण येथील विस्तीर्ण डोंगरात विष्णूचा सहावा अवतार आणि सप्तचिरंजीवापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान परशुरामाचे प्रश्नचीन मंदिर आहे. एका बाजूला काळ, तर दुसऱ्या बाजूला काम आणि मध्ये भगवान परशुराम अशा त्रिमूर्ती मंदिरात विराजमान आहेत. काळ्या पाषाणातील या मूर्ती अत्यंत सुंदर आहेत. अलीकडेच उदयास आलेले पर्यटनस्थळ म्हणजे डेरवण. डेरवणची शिवसृष्टी छत्रपती शिवरायाच्या जीवनाची चित्रमय ओळख करून देणारी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ७०० मीटर उंचीवरील पर्वतरांगेतील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण.

आंबोली घाटातून दिसणारी सह्याद्री पर्वताची विविध रूपे, उंचावरून आवेगाने खाली झेपावणारे शेकडो धबधबे, धुक्यात हरवलेले तळ कोकण ही सारी विलोभनीय दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच या ठिकाणी गर्दी असते. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड यासारखे ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले, मंदिरे आणि अनेक निसर्गरम्य ठिकाणे कोकणात पाहावयास मिळतात. कोकणातील या सृष्टीसौंदर्याचा व ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा आनंद लुटण्यासाठी या दिवसांत थंडगार वातावरणात कुटुंबियांसह कोकणच्या भेटीवर जाण्यास काय हरकत आहे!


मधुकर ठाकूर
रविवार, २८ जून २००९

Photos by : Chanchal47


Stumble
Delicious
Technorati
Twitter
Digg
Facebook
Reddit
Feed

If you like this please Link Back to this article...Stumble Upon Toolbar

0 comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Follow by Email

TOP
To Get Latest Update Subscribe Now !!!